नांदुर्गाःऔसा तालुक्यातील नांदुर्गा,सारणी,हसलगण,गुबाळ,मंगरूळ,गांजनखेडा,संक्राळ,लिंबाळा,भागातील जनतेने गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन निद्राधीन झालेल्या थकल्या जिवावर धरणीच्या थरथराटाने धाड घातली आणि कांही सेकंदातच सारे होत्याचे नव्हते झाले.डोळ्यांदेखत रक्तांची नाती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली.सगळीकडे हाहाकार व आसमांत पोहचणाऱ्या किंकाळ्यांनी 'ती' काळ रात्र आपला डाव साधुन गेली.त्यातच मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली.व मदतीविना दगड माती खाली दबलेल्यांना आपले प्राण गमवावे लागले.आणि जगुन वाचुन राहिलेल्यांच्या डोळ्यादेखत एकाच चितेवर घरातील पाच-ते दहा प्रेत जळताना पहावे लागले.
सदरील घटनेला 31 वर्ष होऊनही,त्या दु:खाची सल कायम असुन,त्यामुळे वाहणाऱ्या अश्रुतून भुकंपग्रस्तांनी धैर्याचा जो बांध निर्माण केला तो निश्चितच संकटाचा सामना कसा करायचा,हेच सर्वांना सांगुण गेला.किंबहुना 31वर्ष मागे वळुण पाहताना ती वैरवी भयाकन पहाट आठवली की चित्त अगदी सुन्न होते.
१९१३ च्या शेकडो लोकांच्या जीवघेण्या भूकंपाची 31 वर्षानंतरही आठवन झाली तर डोळ्यापूढे त्या काळरात्रीचे भीषण दृश्य तरळते आणि ३०सप्टेंबरच्या कटू आठवणी आल्याशिवाय राहत नाही.
औसा तालुक्यासह लोहारा व उमरगा तालुक्यातील ५२ गावांत गुरूवार,३०सप्टेंबर १९९३ च्या पहीटे ४:४५ वाजता सूरू झालेल्या प्रलयंकार भूकंपाच्या धक्क्यांमध्ये गणरायाच्या विसर्जनाचा जल्लोष संपवून निद्रिस्त झालेल्या हजारो नागरिकांची ३० सप्टेंबरची पहाट ही अखेरची 'काळी पहाट'म्हणून उजाडली .या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये हजारो लोक दगड- मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर काहींना कायमचे अपंगत्व आले .हा प्रलय म्हणजे भुकंपग्रस्तांसाठी एक अविस्मरणीय प्रसंग ठरला आहे.आता त्या काळरात्रीला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत.भुकंपाने दिलेल्या शरीरावरील जखमांचे व्रण बूजले खरे परंतु,त्या वेळच्या डोळ्यांदेखत घडलेल्या महाप्रलयाच्या आठवणी आजही भुकंपग्रस्तांच्या मनात घर करून आहेत.
भूकंपाच्या प्रलयानंतर जगभरातून मदतीचा ओघ आला.प्रशासनासह सामाजिक सेवाभावी संथा व अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी मदत करीत भुकंपग्रस्तांचे सांत्वन केले.त्यानंतर भुकंपग्रस्त गावांचे युध्दपातळीवर काम करुन पक्के पुनर्वसन करण्यात आले.परंतु घराचे पुनर्वसन झाले खरे,मात्र 31 वर्षानंतरही भुकंपग्रस्तांच्या मनाचे पुनर्वसन झाले नसल्याचे भुकंपग्रस्तांच्या चेहऱ्यावर आजही स्पष्ट दिसते.या निसर्गाच्या कोपात सापडलेल्या ५२ गावांत आजही ३०सप्टेंबर हा दिवस काळा दिवस म्हणुन पाळला जातो.या दिवसी बहुतांश गावांत व्यवसायकांकडून आपले व्यवसाय बंद ठेवून भुकंपात मृत पावलेल्या व्यक्तींना एकप्रकारे श्रद्धांजली वाहीली जाते.परंतु ज्या नागरिकांनी १९९३ च्या प्रलयंकारी पहाटेचा दुःखद प्रसंग अनूभवला आहे,अशा नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र 31 वर्षानंतरही भूकंपाच्या आठवणीसह भितीचे सावट पहावयास मिळत आहे.
[ अशा आहेत भुकंपग्रस्तांच्या अडचणी]
31 वर्षानंतरही भुकंपग्रस्त प्रमाणपत्रासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.त्यामुळे भुकंपग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगारी वाढत चालली आहे. भुकंपानंतर वसलेली गावे जुने गाव सोडुन त्याच परिसरात पक्के पुनर्वसन करुन वास्तव्य करित आहेत.तर नविन पुनर्वसीत गावे ही जवळ-जवळच कायमस्वरुपी वसली असल्याने गावांच्या सिमांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवाय पुनर्वसीत गावांतील काही गावे वगळता इतर गावातील पथदिवे,रस्ते,पाणी पुरवठा योजना सारख्यां योजनांचा पुरता बोजवारा उडाला असुन अशा अनेक समस्या उभ्या आहेत.त्याच बरोबर औसा तालुक्यातील बऱ्याच पुनर्वसीत गावातील घरांचे कबाले शासनाने वाटप केली नसल्याने ,नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.उपरोक्त बाबींकडे प्रशासनाने लक्ष पुरविने गरजेचे आहे हे अधोरेखीत सत्य आहे.
टिप्पणी पोस्ट करा