शासकीय शाळांमधून औसा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा करजगाव शाळेचा प्रथम क्रमांक

शासकीय  शाळांमधून औसा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा करजगाव शाळेचा प्रथम क्रमांक 

औसा-मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा -टप्पा क्र. 2 या महाराष्ट्र शासनाच्या शालेय स्पर्धात्मक अभियानांतर्गत औसा तालुक्यातून प्रथम  क्रमांक मिळविण्याचा बहुमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव शाळेने मिळविला. या अभियानांतर्गत पायाभूत सुविधा 33 गुण,शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी 74 गुण व शैक्षणिक गुणवत्ता 43 गुण असे एकूण 150 गुणांचे मुल्यांकन प्रत्येक  शाळेचे करण्यात आले.प्रथम शाळा पातळीवर मुख्याध्यापकामार्फत मूल्यांकन करण्यात आले.त्यानंतर  प्रत्येक तालुक्यातील 14 केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याकडून केंद्र स्तरीय मूल्यांकन होऊन प्रत्येक केंद्रांतून प्रथम येणारी एक शाळा  तालुका मुल्यांकनासाठी उपलब्ध करण्यात आली. पंचायत समिती औसाच्या वतीने 14 केंद्रांतून प्रथम येणाऱ्या शाळांचे मुल्यांकन करण्यात आले.या मुल्यांकनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान पटकावला. तालुक्यातून करजगाव शाळा प्रथम आल्यामुळे दि.14/9/2024 रोजी जिल्हास्तरिय मुल्यांकन  समितीने करजगाव शाळेस भेट दिली. जिल्हास्तरिय  मुल्यांकन पथकामध्ये प्रमोद पवार (प्राथ)(उपशिक्षणाधिकारी जि.प.लातुर), संतोष ठाकुर साहेब( अधिव्याख्याता डायट,मुरुड), विकास चव्हाण, अशोक जाधव हे होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 अंतर्गत असणा-या एकूण 150  गुणांचे  जिल्हास्तरीय मुल्यांकन समितीने अत्यंत सुक्ष्मपणे मुल्यांकन केले.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गात जाऊन प्रत्यक्षात मराठी, इंग्रजी, गणित विषयांची गुणवत्ता तपासली.अनेक विद्यार्थ्यांना  वाचायला, लिहायला, इंग्रजी बोलायला लावले.क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय क्षेत्रात केलेल्या कामाची पाहणी केली भव्य.विज्ञान प्रयोगशाळा, सौर ऊर्जेवर चालणारी शाळा,रेनवाॅटर हार्वेस्टिंग,ओपन जीम, लोकसहभागातून भोजन कक्ष , स्काऊट गाईड पथक, आनंददायी शनिवार,परसबाग,शिक्षकांनी बनविलेले शैक्षणिक साहित्य, विज्ञान प्रयोग सादरीकरण, व्यसनमुक्तीसाठी शाळेने केलेले प्रयत्न,शालेय स्वच्छता, शालेय अभिलेखे देखभाल, शालेय आरोग्य,महावाचन चळवळ अभियान सहभाग, विद्यांजली पोर्टल पुर्तता,100% विद्यार्थी आधार वैद्यता,युडायस,सर्व प्रणाली अद्ययावतीकरण,इको क्लब सहभाग, स्वच्छता माॅनीटर मधील सहभाग,आय.सी.टी लॅब, विविध विषयांच्या प्रयोगशाळा, साक्षरता अभियानासाठी शाळेने केलेले प्रयत्न, क्रीडा स्पर्धेतील सहभाग, स्पर्धा परीक्षेमधील सहभाग आदी क्षेत्रांतील शाळेचे कामकाज पाहून जिल्हास्तरीय मुल्यांकन समितीने शाळेविषयी खूप खूप समाधान व्यक्त केले व शाळेचे,शिक्षकांचे व ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले.जिल्हा मुल्यांकनानंतर जिल्ह्याच्या निकालाच्या प्रतीक्षेत शाळा आहे.हे अभियान शाळा पातळीवर यशस्वीपणे राबविण्यासाठी औसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड, गटसमन्वयक तथा आलमला केंद्रांचे केंद्रप्रमुख आर.के.जाधव,औसा केंद्राचे केंद्रप्रमुख शेख एच.आय.,औसा पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे,तांबरवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख चांदपाशा शेख,मातोळा केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश जाधव,खरोसा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख नागेश लोहारे,केंद्रीय मुख्याध्यापक नुरपाशा शेख यांचे शाळेस खूप खूप मार्गदर्शन मिळाले.या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद नयुम सर, शिक्षक साहेबराव कदम सर,संजय जगताप सर, दयानंद कोळसुरे, खुलास राठोड सर,श्री.मोहन क्षीरसागर  सर,श्री.सतीश लोखंडे सर,श्रीमती तानुबाई नाथजोगी मॅडम,श्रीमती  छबुबाई साठे मॅडम,श्रीमती दैवशाला पवळे मॅडम, शालेय पोषण आहार स्वयंपाकी श्री.येडोळे अण्णा ,सौ.लक्ष्मीबाई येडोळे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.निलेश आजने,उपाध्यक्ष श्री.राजेंद्र मुगळे, गावचे सरपंच श्री.विलास कारे, उपसरपंच श्री.श्रीधर जाधव ,शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य* व ग्रामस्थ यांनी खूप परिश्रम घेतले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने