औसा-ॲड.त्र्यंबकदास झंवर या गुणी माणसाने राज्याच्या ग्रंथालय चळवळीत लातूरचा दबदबा निर्माण केला.त्यांचा एक पाईक,औशाचा नागरिक म्हणून लातूरच्या ग्रंथालय चळवळीचे पालकत्व स्विकारुन,राज्यातील ग्रंथालयांना ४० टक्के वाढीव अनुदान,दर्जाबदल,नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता व ग्रंथालयाचे इतर प्रश्न, निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी,मार्गी लागण्यासाठी ग्रामदैवत श्री मुक्तेश्वरांच्या साक्षीने प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही औसाचे आ.अभिमन्यु पवार यांनी दिली.
लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाने गेल्या महिन्यात आ.अभिमन्यु पवार यांची भेट घेवून २०१२ पासून राज्यातील ग्रंथालयाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचे साकडे घातले होते,त्यावर आ.पवार यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची अवघ्या १५ दिवसात म्हणजे २९ ऑगस्टला बैठक आयोजित करुन,त्यात ग्रंथालयांचे ४० टक्के उर्वरित अनुदानवाढ,दर्जाबदल,नवीन ग्रंथालयांना मान्यता आदींबाबत चर्चा घडवून आणून तो मार्गी लावण्यासाठी मोलाचा वाटा उचलला,त्याबद्दल लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाच्यावतीने आ.अभिमन्यु पवार यांचा सोमवार,दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी औसा येथील श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालयात सत्कार सभारंभ आयोजिला होता,त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षपदी जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रभाकर कापसे हे होते.मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र राम मेकले होते.मंचावर कै.रामदास नायक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ऍड.मुक्तेश्वर वागदरे,भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,धनंजय कापरे, गंगाभीषण भंडारी,ग्रंथमित्र हावगीराव बेरकीळे,सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राम मोतीपवळे,उपाध्यक्ष ग्रंथमित्र युवराज जाधव,कालिदास माने यांची उपस्थिती होती.
आमदार म्हणून जात,धर्म,पक्ष न पाहता मी लोकांची कामे करत असतो,करत राहणार असे स्पष्ट करुन मला वाचनाची प्रचंड आवड होती,लातूरच्या बचत ग्रंथालयातून दर्जेदार ग्रंथांचे वाचन केले,ग्रंथालय हे ज्ञानाचे मंदिर आहे,तिथे सरस्वतीची पूजा,आराधना होते,आज पुस्तक वाचन कमी होत असले तरी नवीन वाचक तयार करुन,वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,वर्गणीदार वाढवावेत,ग्रंथ वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनावा,पुस्तक वाचून जे ज्ञान मिळते,आकलन होते,व्याकरण समजते ते मोबाईलमध्ये पाहून,कानातून हेडङ्गोन टाकून ते साध्य होत नाही असे सांगून,मी ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे,तुम्ही जिल्ह्यातील ग्रंथालय चालक,कर्मचार्यांनी येणार्या विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी ताकद उभी करावी असे आवाहन शेवटी केले.
मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले यांनी २०१२ नंतर राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आ.अभिमन्यु पवार यांनी दाखविलेली तत्परता मरगलेल्या ग्रंथालय चळवळीला उर्जितावस्था आणून देणारी आहे,त्याचा अत्यानंद असून,त्यांनी ग्रंथालय चळवळीचे पालकत्व घ्यावे,गं्रंथालयाचे प्रश्न सुटण्यासाठी उप्रमुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह धरुन आचारसंहितेपूर्वी जीआर काढला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
ऍड.मुक्तेश्वर वागदरे यांनीही सार्वजनिक ग्रंथालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन आ.पवार यांनी न्याय द्यावी अशी विनंती यावेळी केली. अध्यक्षीय समारोपात प्रभाकर कापसे यांनी आ.पवार यांच्यामुळे ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावण्यात मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी आ.पवार यांचा अनेक ग्र्रंथालय चालकांनीही शाल,बुके,पुष्पहार,ग्रंथभेट देवून सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र हावगीराव बेरकीळे यांनी केले.सूत्रसंचालन पी.सी.पाटील यांनी केले.या कार्यक्रमासाठी सूर्यकांत जाधव,गिरीधर जंगाले,बाळू वैजवाडे,विकास चिरके,प्रा.एन.जी.माळी,चंद्रशेखर पारुडकर,ग्रंथमित्र संतोष करमले आदिंनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला जिल्हातील ग्रंथालय चालक,ग्रंथपाल,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा