गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
लातूर : येथील दयानंद सभागृहात मंगळवारी (दि. 17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2024 सोहळ्यात सानेगुरुजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष कालिदास माने यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर खा. डॉ. शिवाजी काळगे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे(दिल्ली), मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, प्रा. विठ्ठल कांगणे, ह.भ.प. अनंत माने महाराज, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हाध्यक्ष अशोक देडे आदी उपस्थित होते.
कालिदास माने हे शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत लातूर जिल्हाच नव्हे तर मुंबई, नागपूर आदि ठिकाणी आंदोलने, मोर्चे, उपोषणे वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रशासनास जागे केले आहे.
शिक्षणाचा हक्क ( RTE) कायद्यातील तरतुदीसाठी एक लाख शिक्षकांच्या स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपतींना पाठवले होते. महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत शिक्षक व शाळांना जिल्हा निहाय पुरस्कार सोहळे घेत सन्मानित केले आहेत.
शिक्षकांना न्याय व हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावरील लढाई सोबतच कायदे मंडळात म्हणजेच विधान परिषदेत जाण्यासाठी 2016 व 2022 ची मराठवाडा शिक्षक मतदार संघात उमेदवार म्हणून थांबण्याचे धाडस करून 8 जिल्हे व 76 तालुके पिंजून काढले होते.
शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढत लढत शिक्षकांना रोजगार व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून साने गुरुजी च्या नावाने सानेगुरुजी शैक्षणिक संकुल उभारत साधारणता 200 शिक्षकांना रोजगार व हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम करत आहेत.
याप्रसंगी शैक्षणिक, राजकीय, उद्योग, सहकार, आरोग्य,क्रीडा, प्रशासन, आदि क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच मॉर्निंग वाक ग्रुप, संस्थाचालक संघटना, शिक्षक संघटना, साने गुरुजी शैक्षणिक संकुल, शिक्षक, मुख्याध्यापक आदी सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यु. डी. गायकवाड तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले. आभार महादेव डोंबे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा