औसा विधानसभा मतदार संघातील झोनल ऑफिसर व सेक्टर पोलीस ऑफिसर यांचे प्रशिक्षण संपन्न

औसा विधानसभा मतदार संघातील झोनल ऑफिसर व सेक्टर पोलीस ऑफिसर यांचे प्रशिक्षण संपन्न 
औसा/ प्रतिनिधी-आगामी विधानसभा निवडणूक पुर्वतयारी अनुषंगाने आज औसा येथे क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय आधिकारी यांचे प्रशिक्षण  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार घनश्याम अडसूळ व नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
औसा विधानसभा मतदारसंघांतर्गत ३०९ मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण ३२ झोनची निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये ३२ क्षेत्रीय अधिकारी व ३२ पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एका क्षेत्रीय अधिकारी यांचेकडे १० ते १२ मतदान केंद्राची मतदान केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. हे झोनल अधिकारी प्रत्येक मतदान केंद्राना भेटी देऊन vellnurable polling स्टेशन मैपिंग(असुरक्षीत मतदान केंद्राचे मैपिंग) करणार आहेत‌.मागील सार्वत्रिक निवडणूक तसेच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक दरम्यान कुठे अनुचित प्रकार किंवा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने काही गुन्हे दाखल असतील तर या बाबत तपासणी करुन असे मतदानकेंद्र,गाव ,ठिकाण निःशीत करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर मतदार संघातील सर्व मतदान केंद्र इमारतीची पाहणी करुन तिथे पायाभूत सुविधा जसे पाणी,लाईट,फर्निचर,रैंप,स्वछता गृह आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे.
औसा विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी ३०/८/२४ रोजी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार एकूण ३,०१,८२५ मतदार असून यामध्ये १,५९,६२९ पुरुष १,४२,१९२ महिला ४ इतर मतदार आहेत आगामी विधानसभा निवडणुक आचारसंहिता अंमलबाजणीसाठी ५ स्थिर निगराणी पथक,६ भरारी पथक ,३ व्हीडीओ पथक ,१ खर्च पथक ,१ c -Vigil पथक नेमण्यात येत आहे.
 ३०९ मतदान केंद्रावर १६०० मतदान अधिकारी ४५० पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने