सशक्त समाज व बलशाली राष्ट्रासाठी योग महत्त्वाचा - डॉ. संदिपान जगदाळेलातूर/प्रतिनिधी-व्यक्ती निर्माणातून सशक्त समाजाची उभारणी होत असते. त्यातूनच बलशाली राष्ट्र निर्माण होते. योगामध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच समाजाला जोडण्याची शक्ती आहे. त्यामुळे व्यक्ती विकासाबरोबरच सशक्त समाज निर्माण करण्यासाठी योगाचा उपयोग करावा असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले. ते भारत सरकारच्या खेळ व युवक कल्याण विभाग, कर्नाटक राष्ट्रीय सेवा योजना विभाग त्यांच्या वतीने आयोजित बेंगलोर येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात आयोजित योग शिबिरात बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, "भारतासोबतच आता संपूर्ण विश्व योगाचा स्वीकार करीत आहे. हा एका अर्थाने हा भारतीय संस्कृतीचा विजय आहे. रोज योग व प्राणायामाचा सराव केल्याने शरीर, मन आणि आत्म्यासाठी अनपेक्षित फायदे होतात. योगामुळे शरीरात शांती, आनंद, स्वीकृती आणि विश्रांती मिळते. योग व्यक्तीला आंतरिक शक्ती देतो. योग तेजस्विता देतो आणि दिव्य शक्तीशी जोडतो. त्यामुळे योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे. व्यक्ती विकास झाला की समाज व राष्ट्राचा आपोआपच विकास होईल."
भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालय, युवा सशक्तीकरण व खेल मंत्रालय, कर्नाटक, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय यांच्या वतीने दिनांक १७ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गांधी भवन, बेंगलूरू येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर होत आहे. क्षेत्रीय निदेशक अजय शिंदे, राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, सहाय्यक संचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र +२ स्तरावरील संघ या शिबिरात सहभागी झाला आहे.
या शिबिरात आयोजित योग शिबिरात दयानंद कला महाविद्यालयातील संगीत व योग शिक्षक डॉ. संदिपान जगदाळे व बेळगाव येथील रासेयो समन्वयक प्रा. मल्लप्पा मुग्दम यांनी योग, प्राणायाम व ध्यानाचे धडे दिले. तर कु. अक्षरा वेंकटेंश्वर, नलगोंदा तेलंगणा, कु. हर्शिता उजिरे, मेंगलुर यांनी त्यांना सहाय्य केले. योग शिबिरासाठी कर्नाटक शिक्षण विभाग राज्य समन्वयक रमेश गुब्बु गुडू प्रकाश, सह समन्वयक व्यंकटेश गौडा, एम बलराज, कन्याकुमारी, राजशेखर चव्हाण, धारवाड, साईवर्धन दुर्गम, तेलंगणा, क्याथ्या गौडा, म्हैसूर, सविता येरमल यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.
डॉ. जगदाळे यांच्या राष्ट्रीय स्तरावरील योग प्रशिक्षणातील सहभागाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, पुणे शिक्षण संचालक कार्यालयातील भावेश ढमाले, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा