शिवलिंगेश्वर फार्मसीचा विद्यापीठात ऐतिहासिक निकाल
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये बी. फार्मसी, फार्म. डी व एम. फार्मसी कोर्सचे विद्यार्थी सर्वप्रथम
औसा: (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी जाहिर केलेल्या परीपत्रकामध्ये शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर या महाविद्यालयातील बी. फार्मसी, फार्म डी व एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये बी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थी अरुण वर्मा (86.03 टक्के) गुण घेऊन विद्यापीठातून सर्वप्रथम, बेलकुंदे श्रध्दा (84.34 टक्के) गुण घेऊन तृतीय आली आहे, फार्म डी. अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी कोटेकर नेहा (86.80 टक्के) गुण घेऊन सर्वप्रथम, चिकुर्तीकर प्रज्ञा (88.20 टक्के) गुण घेऊन सर्वद्वितीय व कानडे अर्पिता (85.40 टक्के) गुण घेऊन सर्वतृतीय आली आहे तर एम. फार्मसी फार्मासुटिक्स मधील विद्यार्थीनी पाटील स्नेहा (88.20 टक्के) गुण घेऊन सर्वप्रथम, रुद्रुरकर मुक्ताई (84.90 टक्के) गुण घेऊन सर्वद्वितीय, येलकोटे प्रियंका (84.30 टक्के) गुण घेऊन सर्वतृतीय आली आहे आणि एम. फार्मसी फार्मासुटिकल केमिस्ट्रीची विद्यार्थीनी सोनटक्के पुजा (86.92 टक्के) गुण घेऊन सर्वप्रथम, तंगे पुजा (85.94 टक्के) गुण घेऊन सर्वतृतीय आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास कापसे, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या स्वाती कापसे, ब्ल्यू बर्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य योगेश माशाळकर, विश्वेश्वरय्या औद्यौगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे यांनी यशस्वी विद्याथ्र्यांचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यापीठ परीक्षेत मिळवलेले यश हे ऐतिहासिक व अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे यांनी काढले.
तसेच संबंध जिल्हयातून व सर्वस्तरातून यशस्वी विद्याथ्र्याचे व महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनीही कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق