अष्टविनायक मंदिरामध्ये १ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट संगीत समारोह
लातूर दि. ३० येथील लातूर अर्बन बँकेच्या वतीने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर दिवाळी पहाट निमित्त दीपोत्सव आणि संगीत समारोहाचे आयोजन केले आहे. अष्टविनायक मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये दहा हजार दिव्यांचा दीपोत्सवाच्या साजरा होणार आहे. यामध्ये पहाटे साडेचार ते साडेपाच दीपोत्सव व पाच ते आठ या वेळेत संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील बारा वर्षांपासून दीपावलीनिमित्त मा. प्रदीप राठी यांच्या संकल्पनेतून सातत्यपूर्ण या संगीत समारोहाचे आयोजन लातूर मध्ये केले जाते आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लातूरकर दरवर्षी आतुरलेले असतात.
यावर्षी होणाऱ्या या दिवाळी पहाट संगीत समारोह कार्यक्रमासाठी केरळ येथील प्रसिद्ध युवा गायिका भारत की बेटी सूर्या गायत्रीचे गायन होणार आहे. याच कार्यक्रमांमध्ये चेन्नई येथील प्रसिद्ध जिओश्रेड हे अत्याधुनिक आयपॅड वरील वाद्य वाजवणारे प्रसिद्ध कलावंत महेश राघवन, चेन्नई येथील प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्रवण श्रीधर, तबलावादक तनय रेगे, कीबोर्ड वादक कौशिकी जोगळेकर व केरळा येथील मृदंगम वादक अनिल कुमार हे येणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगली येथील मोनिका करंदीकर या करणार आहेत. प्रति प्रमाणे या कार्यक्रमाची सांगता आरतीने होईल व त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद असेल. तरी सर्व संगीत रसिकांनी या दीपोत्सव आणि संगीत समारोह कार्यक्रमासाठी जरूर यावे असे आग्रहाचे निमंत्रण रमण मालू , आकाश राठी, शुभदा रेड्डी, अभय शहा,नवनीत भंडारी, नरेश सूर्यवंशी,सोनाली ब्रिजवासी, प्रा. शशिकांत देशमुख, डॉ. संदीप जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, लातूर अर्बन बँक, अष्टविनायक प्रतिष्ठान लातूर तसेच आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
إرسال تعليق