माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील पांडुरंग ऍग्रो इंडस्ट्रीजला दिली भेट

 माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न  बाजार
समिती परिसरातील पांडुरंग ऍग्रो इंडस्ट्रीजला दिली भेट

 लातूर प्रतिनिधी

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार
दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील लातूर कृषी उत्पन्न  बाजार
समिती परिसरातील लक्ष्मीनारायण (लालू) पांडुरंग कचोरिया,हरीनारायण (चंदू)
पांडुरंग कचोरिया यांच्या पांडुरंग ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊन उपस्थित
व्यापाऱ्यांशी संवाद साधून काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्वांनी
खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा
दिल्या.

 उपस्थित व्यापाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे काँग्रेस  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

 यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती
सुनील पडीले  माजी सभापती ललितभाई शहा,हुकूमशेठ कलंत्री,अशोक
अग्रवाल,अशोक लोया,पांडुरंग कचोरिया बालाप्रसाद बीदादा राहुल लोया श्याम
मंत्री सुनील राठी आबासाहेब माने संतोष तोष्णीवाल सुरेश मालू, आनंद
मालू,दत्ता शिंदे,गौरव कचोरीया, कस्तूभ बाहेती मनीष कलंत्री किशोर
बीदादा,ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख,बळवंत पाटील,शिवाजी
कांबळे बालाजी बरुरे दिनकर मोरे नितीन कलंत्री सुरेश ढमरले अनिल चांडक
शशिकांत चलवाड,रमेश सूर्यवंशी,माणिक पडूळे सुरेश ढमाले,सचिन
बंडापले,युनूस मोमीन,दत्तात्रय माने बब्रुवान मोहिते लालाशेठ बाहेती संजय
पाटील आदीसह व्यापारी गुमास्ता बांधव कचोरीया कुटुंबीय मित्रपरिवार
उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم