दीपावली निमित्ताने स्वच्छतेचा सोहळा

 

दीपावली निमित्ताने स्वच्छतेचा सोहळा

लातूर-दिवाळी म्हणजे तेज, खाद्य, हास्य, आनंद,

रांगोळी आणि दिव्यांचा सण. याबरोबरच दिवाळी म्हणजे स्वच्छतेचा देखील सण.

आपला लातूर जिल्हा स्वच्छ, सुंदर, हरित असावा याकरिता मागील 1980 दिवसांपासून अखंड प्रयत्न करणाऱ्या

ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी आज पीव्हीआर चौकामध्ये स्वच्छता मोहीम राबवून यापूर्वी लावलेल्या शोभिवंत झाडांचे संगोपन कार्य केलं. झाडाभोवती वाढलेले तण, गाजरगवत, खुरटी झाडे कापून काढली. नागरिकांनी परिसरात फेकलेला कचरा एकत्रित केला.

झाडांच्या छाटन्या करून 

चौक झाडांनी समृद्ध, स्वच्छतेने चकाचक, सुंदर आकर्षक दिसेल असा प्रयत्न केला.

यावेळी एक गाडी केरकचरा एकत्रित केला. 

दीपावली निमित्ताने आपल्या शहराची स्वच्छता करावी, आपलं शहर स्वच्छ दिसावं या उद्देशाने श्रमदाना करिता आलेल्या उपस्थित सदस्य 

डॉ. पवन लड्डा, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल, कांत मरकड, आकाश सावंत रवी तोंडारे, आशा अयाचित, प्रा. मीनाक्षी बोंडगे, दिपाली राजपूत, डॉ. नागरगोजे, किरण जाधव, हुडगे, प्रविण खडके, बालाजी उमरदंड, नागसेन कांबळे, सुवर्णा महाजन, राहुल माने, प्रवीण भराटे, गणेश सुरवसे या सर्व सन्माननीय सदस्यांच आमचं ग्रीन लातूर फाउंडेशन च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. लातूरकरांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता पुढाकार घ्यावा, कचऱ्याचे प्रमाण कमी करावे, कचरा इतरत्र न फेकता कचरा घंटा गाडीतच द्यावा असे आव्हान कांत मरकड व आकाश सावंत यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم