श्री चौदाघर मठ देवस्थानात
लातुर :-लातुर येथील गावभागात संत शिवयोगी झिंगणप्पा स्वामींचे चौदाघर मठ देवस्थान संस्थानात गुरुवार दि.११/९/२०२५ रोजी रात्री ११:००वा. चौदाघर युवक मंडळाच्या पंचपदी शिवभजनांनी संत शिवयोगी झिंगणप्पा सिध्दमलप्पा स्वामींचा दिंडी,सप्ताहास भव्य प्रारंभ होत आहे.
या वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताहा अंतरगत चौदाघर मठ,पाचशेघर मठ ,करबसप्पा मठ,भैरवनाथ महीला ,बस्वेश्वर महीला,रामदेव बाबांचा जंम्मा, प्रा लक्ष्मण श्रीमंगले,प्रा. शिवकुमार उरगुंडे प्रा. राहुल कदम प्रा.विठ्ठल जगताप प्रा शंकर जगताप व नवोदित गायकांचा सहभाग , आदींची संगीत गायण,भक्तीगीतांचा कार्यक्रमही आयोजला असुन या सप्ताहात विविध भक्तांच्या ग्रुप कडुन महाप्रसादाचे दैननदीन आयोजन आहे,यावर्षी युवकांच्या कार्यास प्रोसाहन देऊन मजम्माचे आयोजन स्वामींच्या दिंडीत पालखी मिरवणुकी सोबतच करण्यात आले आहे. हा दिंडी सप्ताहा ,दिंडी, पालखी मिरवणुक यशस्वी पारपाडण्यासाठी संयोजक प्रा.विश्वनाथ स्वामी राडीकर,सह संयोजक मन्मथप्पा बिडवे चौदाघर मठाचे युवाकार्यकरणी सदश्य, चौदाघर मठ देवस्थान विश्वस्त कमिटी, चौदाघर मठ महीला भजनी मंडळ सदश्या परिक्षम करत आहेत.
अध्यक्ष गंगाधरप्पा मंठाळे,उपाध्यक्ष विजयकुमार चोळखणे,सचिव श्रीशैल्य सिध्देश्वरे,सिद्रामप्पा औरादे,राजकुमार झिपरे,बाबु वाघमारे ,बसवण्णाप्पा सोलापुरे,अॅड औदुंबर मंठाळे,धुळाप्पा जयशेटे महेश कलेमले दत्ता बसपुरे स्वामी पुजारी दत्ता स्वामी बाभळगावकर आदी परिक्षम घेत आहेत.
दि. १८/९/२५ रोजी रात्री ११:०० वा. सप्ताहातील टाळपडण्या कार्यक्रम,दि.२१/९/२५रोजी रात्री ११:००वा. श्री झिंगणप्पा स्वामींची पालखी मठातुन निघेल सोबत विविध गावचे टाळकरी भजनी मंडळ,चौदाघर मठ महीला मंडळ ,चौदाघर युवा भजनी मंडळ,सर्व विश्वस्त मंडळ संयोजक, सहसंयोजक यांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणुक निघुन आझाद चौक, बालाजी मंदीर पापविनाश मंदीर जुनी भाजी माक्रेट आसोप्पा गल्ली,झिंगणप्पा स्वामींच्या मठात विसावा
२२/९/२५सोमवारी झिंगणप्पा गल्ली येरटे गल्ली, औसा हनुमान ते चौदाघर मठ देवस्थानात सकाळी ११:००वा.श्रीची आरती होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.
वरिल सर्व कार्यक्रमात भाविकांनी हजर राहुन सहकार्य करावे असे संयोजक,सहसंयोजक,व मठाचे विश्वस्तांनी कळवले आहे.
टिप्पणी पोस्ट करा