सिद्धी शुगरच्या आगामी गाळप हंगामासाठी बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात
अहमदपूर : सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आगामी २०२६-२७ ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळ्याने करण्यात आला. ह.भ.प. कैलास महाराज लिंगदाळकर यांच्या शुभहस्ते बॉयलरचे अग्नीप्रदीपन करण्यात आले.
साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या दृष्टीने बॉयलर अग्नीप्रदीपन हा महत्त्वपूर्ण व पारंपरिक सोहळा मानला जातो. कारखान्याचा बॉयलर हा कारखान्याचे ‘हृदय’ म्हणून ओळखला जातो. यावेळी बॉयलरचे पूजन करून आगामी गाळप हंगाम कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत व यशस्वीपणे पार पडावा, तसेच कारखाना, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भरभराट व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या सोहळ्यास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी सरपंच साहेबराव जाधव, लातूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, व्यवस्थापकीय संचालक अविनाशभैय्या जाधव, प्रदेश सरचिटणीस शिवानंदतात्या हेंगणे, पंचायत समिती सभापती सुरजभैय्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे, जिल्हा परिषद सदस्य आश्विन नागराळे, सिद्धी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी अशोकराव कासले, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्याम भगत, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, सरपंच गंगाधर राऊत, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बालाजीराव येळापुरे, पी. पी. ईगे सर, रामभाऊ नरवटे, संजय आलमले सर, सरपंच प्रवीण रेड्डी, बळीराम माकने, सरपंच बाळासाहेब मुंडे, चेअरमन चंद्रकांत गंगथडे, केन जनरल मॅनेजर पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, माजीद जागीरदार, श्री. पाटील, ज्ञानेश्वर शेळके, बाळासाहेब शेळके, ॲड. सादिक शेख, व्यंकटराव वंगे, ईश्वर कारनाळे, नागेश बेंबडे, बापूसाहेब जाधव, भरत शिंदे, बालाजी गाडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिद्धी शुगरचे संचालक, चेअरमन, विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा