फुले एज्युकेशन तर्फे गौरी व अक्षय पिंगळे यांचा सन्मान
पुणे येथील ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी १० दिवसांच्या चक्री उपोषणातील सहभागाची दखल
पुणे : ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ५ ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पुण्यात झालेल्या चक्री उपोषणात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल गौरी व अक्षय पिंगळे यांचा फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ, पुणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.अँड. मंगेश ससाणे, ॲड. मृणाल ढोले पाटील, नितीन बोराटे यांचे व सकल ओबीसीच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणामध्ये श्री. बंडू ऊर्फ दीपक कचरे सोबत सौ. गौरीताई पिंगळे यांनी महिला कार्यकर्ती म्हणून सलग दहा दिवस उपोषण करून सहभाग घेतला. अक्षय पिंगळे यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच भिडे वाडा, महिलांच्या कुस्ती स्पर्धाचे आयोजन व इतर सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा अर्धपुतळा, व सावित्रीमाई फुले ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ समाजसेवक काळुराम ऊर्फ अण्णा गायकवाड व सुरेश कालेकर काका यांच्या शुभहस्ते, संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्य मृणाल ढोले पाटील, मंगेश ससाणे, सुनीता भगत , भास्कर जाधव तसेच उपोषणकर्ते बंडू कचरे, गणेश झुरंगे व अमोल राजमाने यांचाही सन्मान फुले एज्युकेशन तर्फे करण्यात आला. उपोषणाच्या दहाव्या दिवशी सहभागी झाल्याबद्दल सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचाही सकल ओबीसीने गौरव केला.याप्रसंगी महापुरुषांच्या जयघोषात, घोषणाबाजी आणि पेढे वाटून आनंदउत्सव साजरा करीत उपोषणाची सांगता करण्यात आली. गौरीताई पिंगळे यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन केले, सूत्रसंचालन धनंजय झुरंगे यांनी केले तर बंडू कचरे यांनी मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे सोबत उपसमिती आणि सरकारचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा