जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात 'शिवलिंगेश्वर फार्मसी कॉलेज'चे घवघवीत यश; पटकावली ७ पारितोषिके
औसा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पेठ उपकेंद्रात आयोजित 'जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव २०२६-२७' मध्ये आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गतवर्षीच्या यशाची परंपरा कायम राखत, यंदाही विद्यार्थ्यांनी विविध संशोधन व सृजनशील सादरीकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत एकूण ७ पारितोषिके पटकावली आणि महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांमध्ये मिळवलेले यश खालीलप्रमाणे आहे:■ मानव्यशास्त्र, भाषा आणि ललित कला विभाग:अनुष्का भोसले (पदवी स्तर)- प्रथम क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. व्ही. एम. धराशिवे), ■ वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा विभाग: अमरजीत पाटील (पदव्युत्तर स्तर) - द्वितीय क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. एस. एस. कुलकर्णी), ■ कृषी आणि पशुसंवर्धन विभाग: सोहम उलागड्डे (पदव्युत्तर स्तर) - प्रथम क्रमांक-(मार्गदर्शक: डॉ. एस. एस. कुलकर्णी), ■ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग: श्रद्धा कापसे (पदवी स्तर) - प्रथम क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. व्ही. एम. धराशिवे), गौतम दुर्गम (पदव्युत्तर स्तर) - प्रथम क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. ए. बी. गिरी), कोटगीरे ओंकार (पदव्युत्तर स्तर)- तृतीय क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. व्ही. बी. वडेवाले), ■ वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र विभाग: मोरे यश (पदव्युत्तर स्तर) - द्वितीय क्रमांक (मार्गदर्शक: डॉ. एस. एस. कुलकर्णी).विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचा संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील अग्रक्रम पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.या यशाबद्दल विजेते विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق