मुप्टा शिक्षक संघटना, अल्पसंख्यांक पदवीधर सतीश चव्हाण यांच्या पाठीशी लातूर संवाद दौऱ्यात शिक्षक, प्राध्यापक पदवीधरांची एकजूट

 मुप्टा शिक्षक संघटना, अल्पसंख्यांक पदवीधर सतीश चव्हाण यांच्या पाठीशी लातूर संवाद दौऱ्यात शिक्षक, प्राध्यापक पदवीधरांची एकजूट 


लातूर :मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल केवळ ५० कोटी निधीच्या १ हजार कोटी होते मात्र महायुतीच्या काळात स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या महामंडळाच्या निधीत वाढ करून १ हजार कोटींची तरतूद अजितदादा पवार यांनी करून दिली असे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी लातूर येथील अल्पसंख्यांक शिक्षक संवाद बैठकीत केले. अल्पसंख्यांकाच्या सर्व समस्याची जाणीव मला असून लोकामनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना मीं काढण्यासाठी जे जे प्रयत्न आगामी काळात करता येईल ते मीं करेल असा विश्वास उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शिक्षक पदवीधर सतीश चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचा निर्धार या संवाद बैठकीत पदवीधरांनी केला. 
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त संवाद दौऱ्या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शिक्षक, पदवीधरांशी शनिवारी (दि. १०) संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.अफसर शेख, महाराष्ट्र उर्दु संघटना जिल्हाध्यक्ष श्री.नुसरत कादरी, श्री.रामदास पवार, श्री.जावेद पटेल, श्री.लायक पटेल, श्री.मझहर शेख, श्री.अंकुश नाडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उमेदवार सतीश चव्हाण यांनी  लातुर शहरातील संगणक शास्त्र विज्ञान व माहिती तंत्रज्ञान (कॉक्सिट) महाविद्यालयास भेट देऊन प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम.आर.पाटील, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, प्राचार्य आर.एस.अवस्थी, ईलाही मासुमदार, रामदास पवार,अशोक मोटे श्री.अंकुश नाडे,  लातुर शहरातील दयानंद शिक्षण संस्थेच्या संवाद प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव श्री.रमेश बियाणी, ॲड.श्रीकांत उडगे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने