गंगाधर डिगोळे ‘रयत पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित
रयत प्रतिष्ठानच्या ११ व्या वर्धापन दिनि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव; महारक्तदान शिबिराचे आयोजन
लातूर : येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी रयत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘रयतरत्न पुरस्कार सोहळा-२०२६’ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक अदिती एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘पत्रकार रत्न पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गंगाधर डिगोळे हे सन २०२१ पासून दैनिक अदिती एक्सप्रेसच्या माध्यमातून ग्रामीण प्रश्न, शैक्षणिक घडामोडी, सामाजिक उपक्रम आणि लोकहिताचे विषय सातत्याने मांडत आहेत. तसेच नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. ते सन २००८ पासून साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असून, ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य संस्कार केंद्राच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. साहित्य सारथी कला मंचच्या माध्यमातूनही नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करीत आहेत.
कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सिनेअभिनेता व निवेदक बालाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, सचिन फत्तेपुरे, नेताजी रणखांब, रामभाऊ लोखंडे, सुनीलकुमार डोपे, अॅड. वैशालीताई लोंढे, किरण कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा