अकोला येथील कार्यक्रमात लातूर लिनेस क्लबची बॅनर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांकावर भरारी
लातूर-अकोला येथे आयोजित ऑल इंडिया लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन, डिस्ट्रिक्ट एमएच-5 हिरकणी यांच्या बहुप्रांतीय अध्यक्षा यांच्या अधिकृत सदिच्छा भेट कार्यक्रमात लातूर लिनेस क्लबने उत्कृष्ट कामगिरी बजावत दोन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासह विशेष पारितोषिके पटकाविले. यामध्ये बॅनर प्रेझेंटेशन स्पर्धेत लातूर लिनेस क्लबने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल लातूर टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमास ऑल इंडिया लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन, डिस्ट्रिक्ट एमएच-5 हिरकणीच्या संस्थापक अध्यक्षा लि. डॉ. मंजिरी कुलकर्णी, अध्यक्षा लि. आशा मोहन, माजी अध्यक्षा लि. निरंजना भंडारी, मल्टिपल अध्यक्षा लि. अल्का डोंगरे, लि. ममता सूर्या, लि. कल्पना देशमुख, लि. दिपाली नंदा, लि. सुनीला नरप्पनवार, लि. निर्मला जैन, लि. अंजली विसपुते, लि. उषा बाहेती, माजी प्रांताध्यक्ष लि. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, लि. साधनाताई पळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लि. विद्याताई देशमुख, लि. सुवर्णाताई महाजन, लिनेस क्लब लातूरच्या अध्यक्षा लि.आदिती पाटील कव्हेकर, लि.अरूणाताई कांदे, लि.मिनाक्षी करडखेलकर, लि.निता सुलगुडले, लि.शैलजा रेड्डी, लि. छाया माने, लि.जगदेवी वारद, लि.जयश्री गायकवाड, लि.सुलभा साकोळकर, लि.कविता जाधव, लि.मनिषा बोळशेट्टे, लि.योगेश्वरी मुकदम, लि.सुरेखा उचाटे, लि.अनिता गायकवाड, लि.कल्पना मोदी, लि.शिवलिला आवाळे आदी उपस्थित होते.
अकोला येथे आयोजित लिनेस क्लबच्या या कार्यक्रमात लातूर लिनेस क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सहभागातून लिनेस सदस्यांमधील संघभावना, कल्पकता तसेच सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.
लातूर लिनेस क्लबने बॅनर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्यासोबतच लिनेस सदस्यांची सर्वाधिक उपस्थिती या स्पर्धेतही विशेष पारितोषिक मिळविले. या दुहेरी यशामुळे लातूर लिनेस क्लबच्या कार्याची आणि टीमच्या एकजुटीची विशेष दखल घेण्यात आली असून, लातूर टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा