एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू

एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू

लातूर : येथील एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ' बहुराष्ट्रीय कंपनी  डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, हैदराबाद'ची महाराष्ट्रातील पहिला 'पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह'  यशस्वीरित्या पार पडला .
हा ड्राईव्ह डिप्लोमा, इंजीनियरिंग, रसायन शास्त्र आणि बायोटेक्नॉलॉजी  या  शाखेतील अंतिम वर्षाच्या  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.या ड्राइव्हमध्ये खालील संस्थांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला:त्यामध्ये प्रामुख्याने एम. एस. बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, राजर्षी शाहू कॉलेज, दयानंद सायन्स कॉलेज,  व्हीडीएफ (VDF) कॉलेज, तसेच कॉक्सिट (COCSIT), महाविद्यालय लातूर यांचा सहभाग होता.यावेळी प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. श्रीकांत नागुरे , डॉ. ओ. बी. शिवपुजे, प्रा. राहुल व्यवहारे, प्रा. सूरज बिराजदार, प्रा. शुभम पाटील आणि प्रा. शैलेश पाटील यांनी काम पाहिले.याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उप प्राचार्य वीरभद्र बाळे  निबंधक डॉ. सौ ज्योती पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि संबंधित प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने