कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात नवमतदार नोंदणी उपक्रम उत्साहात
बाभळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने नवमतदार नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.
लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे, युवकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पात्र विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी आणि लोकशाहीतील नागरिकांच्या जबाबदारीविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
महाविद्यालयातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून युवकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याचा सकारात्मक संदेश प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी यावेळी दिला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत मोरे डॉ. पांडुरंग मुंढे डॉ. कांतराव पोले, डॉ. विवेक जाधव यांनी परिश्रम घेतले
إرسال تعليق