लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारतर्फे शांतता पोस्टर व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
पुणे/प्रतिनिधी: लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार यांच्या वतीने १० ऑक्टोबर २०२६ रोजी विशाल संपूर्ण आरोग्य संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पीस पोस्टर (चित्रकला) व निबंध स्पर्धे’तील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात शांतता, बंधुभाव आणि सर्जनशीलता वाढविणे, तसेच जागतिक शांततेचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी चित्रकला व निबंधाच्या माध्यमातून शांततेचे महत्त्व आणि सामाजिक सलोख्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.
या कार्यक्रमास लायन्स क्लबच्या प्रथम उपाध्यक्ष लायन डॉ. शीतल मोरे म्हैसणे, लायन डॉ. संघर्ष म्हैसणे, लायन दादाराव फाटे, लायन डॉ. विशाल गुरव, लायन जयंत बोंडे आणि संस्थापक लायन प्रीती बोंडे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारचे संस्थापक लायन प्रीती बोंडे अध्यक्ष लायन डॉ. प्रज्ञा देवकाते, सचिव लायन वैशाली वाकचौरे आणि खजिनदार लायन भक्ती बरहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रमही त्याचाच एक भाग होता.
कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा