रस्ते सुरक्षिततेसाठी विलास साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम संपन्न

 रस्ते सुरक्षिततेसाठी विलास साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम संपन्न

लातूर/प्रतिनिधी:विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी, ता. जि. लातूर येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ते वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर (Reflector) लावण्याचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून यामुळे ऊसवाहतुकीसाठी वाहनांची मोठी रस्त्यावर वर्दळ आहे. विलास कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, बैलगाडी व हार्वेस्टरच्या पाठीमागील बाजूस हे रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. रात्री-अपरात्री ऊसाने भरलेली वाहने रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता कमी व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या कार्यक्रम प्रसंगी आर.टी.ओ.श्री.क्षीरसागर यांनी वाहन चालकांना अनेक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या या प्रसंगी बोलतांना वाहनांना सुरक्षिततेसाठी मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. वाहन चालवताना मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावू नये. विना लायसन गाडी चालवू नये,चालकाने लायसन सोबत ठेवावे, वाहने नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत. मद्यपान करून वाहन चालवू नयेत, वाहन रस्त्यावर उभा नियमानुसार करावे, वाहन उभा केलेल्या ठीकाणचे लावण्यात आले दगड, फाद्या वापरानंतर रस्त्यावरुन काढून टाकाव्यात आदी महत्वपूर्ण सुचना दिल्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे संचालक मा.श्री.अनंत बारबोले यांनी परीवहन अधिकारी यांचे स्वागत केले व कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करुन परीवहन अधिकाऱ्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केल्या बद्दल आभार मानले.यावेळी कारखान्याचे खातेप्रमुख,विभागप्रमुख, कर्मचारी तसेच वाहन मालक, चालक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने