द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने चर्चासत्र

 द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने चर्चासत्र 


  लातूर/प्रतिनिधी:द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने companies Auditors Report under CARO & schedule III Amendments या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या दिल्ली येथील इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष सीए दुर्गेश काबरा यांच्यासह सीए सौरभ अजमेरा व सीए पंकज तिवारी यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी सीए सुनील कोचेटा,राजू सारडा,उदय स्वामी,दीपक नवटक्के, जुगल बाहेती,विनोद साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
      द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या लातूर शाखेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती लातूर शाखेचे अध्यक्ष द्वारकादास भुतडा यांनी दिली.ICAI दिल्ली ने इमारत बांधकामास परवानगी दिली असून शाखेची स्वतःची इमारत उभी राहण्यासाठी दुर्गेश काबरा यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाध्यक्ष द्वारकादास भुतडा,उपाध्यक्ष विश्वास जाधव,सचिव राहुल धरणे,कोषाध्यक्ष महेश तोष्णीवाल,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ धर्माधिकारी, सदस्य निलेश बजाज यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने