दिवंगत पंतप्रधान गांधी यांच्या जयंती निमित्त सद्भावना दिवस साजरा

 दिवंगत पंतप्रधान गांधी यांच्या जयंती निमित्त सद्भावना दिवस साजरा

लातूर:- दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शनिवार दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी  यांची जयंती  सद्दभावना दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आला . याप्रसंगी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे  उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी असे प्रतिपादन केले की,"राजीव गांधी यांच्या मातोश्री आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी हे भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले .सुरुवातीला वैमानिक असलेले राजीव गांधी नंतर पंतप्रधानपदी रूजू झाले.नंतर त्यांनी त्यांच्या धोरणांमधून विकसित भारताचं स्वप्न देशाला दाखवलं. देशामध्ये राष्ट्रीय एकता, शांती, प्रेम टिकून रहावं आणि वृद्धिंगत व्हावं यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले . आपल्या आचार व विचारातून देशातील सार्‍या जाती-धर्मांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले .सद्भावना या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. या दिवसाचं औचित्य साधून इतरांप्रती चांगली भावना, हित यांची कामना करा असा हा दिवस आहे.राजीव गांधी यांचा मृत्यू देखील भयंकर मानवी बॉम्बस्फोटा द्वारे झाला. १९९१ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लिट्टे या दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या घडवून आणली. अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. राजीव गांधी यांनी  दहा वर्षीय राजकीय कारकिर्दीत  आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.असे प्रतिपादन उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी याप्रसंगी केले. सद्भावना दिवस शपथ कार्यक्रमात लेफ्टनंट विवेक झंपले यांनी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी  यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे डॉ.शिवाजी जवळगेकर, डॉ. रमेश पारवे, डॉ सुनील साळुंके डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ प्रशांत मान्नीकर, डॉ संतोष पाटील, डॉ. बालाजी घुटे, डॉ.रामेश्वर खंदारे, डॉ.संदिपान जगदाळे, प्रा.विलास कोमटवाड,प्रा.सुरेश क्षीरसागर,प्रा.महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक रूपचंद कुरे, रामकिसन शिंदे व कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने