गोसावी समाज थेट छञपती शिवाजी महाराज घराण्याशी जोडला आहे.:छञपती संभाजीराजे

 गोसावी समाज थेट छञपती शिवाजी महाराज घराण्याशी जोडला  आहे.:छञपती संभाजीराजे


 
 
लातूर-गोसावी समाज हा धार्मिक आहे , प्रामाणिक आहे,वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन उतरलेला आहे. बहुतांश मठाधिपती हे गोसावी आहेत. निश्चल पुरी कृत दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा हा गोसावी समाजाचा ब्रँड आहे.गोसावी समाज हा डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी जोडला गेला आहे.हा एवढा मोठा बहुमान कोणत्याही समाजाला मिळाला नाही. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला मी तुमच्या सोबत असेन.गोसावी समाज हा अतिशय प्रगल्भ आहे. या समाजाला धार्मिक वसा आणि वारसा आहे तोच वसा आणि वारसा गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरचे डॉ. धर्मवीर भारती,अनिल पुरी यांच्या माध्यमातून चालवला जात आहे. याचा मनस्वी आनंद आहे. असे प्रतिपादन श्रीमंत युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी गोसावी  समाजाच्या महाधिवेशनात केले.
गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त.  दयानंद सभागृहात हे  महा अधिवेश हजारो समाज बांधवाच्या उपस्थितीत
संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत युवराज छञपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते योगेश बन (नागपूर)तर प्रमुख  मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध युवा कीर्तनकार अविनाश भारती यांच्या सह युवा उद्योजक सुखदेव गिरी (कोल्हापूर),शिवसंभा गोसावी (पुणे)आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉ कृष्णदेव गिरी,युवा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गिरी (हडपसर) यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी ,डॉ.अशोक बन (परभणी)धनराज गिरी (उमरगा)अँड.राजश्री गोसावी (सांगली)आदी मान्यवरांना "राज्य समाज"भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.तर उपक्रमशील व आदर्श कार्य संघटना म्हणून दशमान युवक प्रतिष्ठान परभणी यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.तसेच डाँ धर्मवीर भारती,सौ मिरा धर्मवीर भारती.डाँ विश्रांत भारती, प्रा.रमेश भारती यांनाही आपल्या उल्लेखनीय कामाबदल या वेळी सन्मान करण्यात आला.आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या प्रा.संतोष गिरी (नांदेड),अमित पुरी (बर्दापुर),गोविंद गिरी (अहमदपूर),केतन पुरी (धाराशिव),सौ.अनिता भारती (अंबेजोगाई),सुनील भारती (जालना)प्रमोद गोसावी (बार्शी)आदी मान्यवरांना"गौरव कर्तृत्वाचा"या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सौ.सुनिता पुरी,सौ.पूनम गिरी,दिलीप गिरी,दत्ता पुरी,शंकर गिरी,बंडू पुरी आदी समाज बांधवांना विशेष पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले अधिवेशनात इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात राज्य स्तरीय वधू-वर परीचय मेळावा संपन्न झाला.या महा अधिवेशनाचे प्रास्ताविक डाँ धर्मवीर भारती यांनी केले तर सुञसंचलन संयोजक अनिल पुरी यांनी केले.या महा अधिवेशनाला महाराष्ट्रातील हजारो समाज बांधवांची मोठ्या  संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने