राजा नारायणलाल लाहोटी मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

                         राजा नारायणलाल लाहोटी मध्ये  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

                   


 लातूर  राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलास्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेसंस्थेचे सदस्य रवी व्होराअॅड स्नेहल उटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

विद्यर्थ्यांनी स्कूलच्या मिलिटरी बँडचे सादरीकरण केलेसंगीत विभागाने  वतनहर घर तिरंगाकांधो से मिलते है कंधे” ही देशभक्तीपर गीत  सादर केलीअबोली गोजमगुंडेआर्या तापडीया यांची उत्स्फूर्त भाषणे झालीयोग नृत्य - जिम्नॅस्टिक - एरोबिक्स - स्किपिंग - झुम्बाने यासह देशभक्तीपर गीता वरील विद्यार्थ्यांच्या नृत्य अविष्काराने  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेश्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थालातूर यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रोप स्किपिंग स्पर्धेतील एकूण 16 विजेत्यांना यावेळी अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्कूलचे चेअरमन  आनंद लाहोटी यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य चळवळीतील वीरांचा गौरव केला आणि स्वातंत्र्यसैनिकांना विशेष आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षत दरक  मिताली भुतडा यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने