शारदा विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
लातूर / प्रतिनिधी- येथील शारदा विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शारदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी शरयू पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्या कोकाटे, मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांच्यासह शिक्षिका दर्शना देशमुख, अनघा पाटील, मानसी पाटील, सुषमा मुंडे, रेणुका समुद्रे, वर्षा कांबळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा