विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना येथे
भारतीय स्वातंत्र्याच्या आमृतमहोत्सव दिनानिमीत्त ध्वजारोहन संपन्न
.jpeg)

विलासनगर :-- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहाकारी साखर कारखाना साईटवर भारतीय स्वातंत्र्याच्या आमृतमहोत्सव दिनानिमीत्त मंगलमय वातावरणात लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन प्रमोद जाधव,विलास कारखान्याचे व्हा चेअरमन रविंद्र काळे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, तात्यासाहेब देशमुख, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, सुर्यकांत पाटील, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखॉ पठाण, शंकरराव बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, विलास चामले, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख आदींची उपस्थिती होती.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस नेत्यांचे योगदान किती मोलाचे होते याची माहिती देवून सर्वांना देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा