केशवराज् रेनिसन्स स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

                 केशवराज् रेनिसन्स स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

लातूर/प्रतिनिधी: श्री.केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संघाचे धाराशिव जिल्हा कार्यवाह,केशवराज माध्यमिक विद्यालय अर्थसमिती माजी अध्यक्ष नरेंद्र पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
           यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी श्री. केशवराज् रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष तथा माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष धनंजय तुंगीकर,माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष प्रदीप राऊत,माजी विद्यार्थी संघ सहसचिव सौ.वृंदा कुलकर्णी,कोषाध्यक्ष रविंद्र बारस्कर,सदस्या सौ.सुप्रिया सावंत तसेच ओंकार देशपांडे तावशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ.अलिशा अग्रवाल यांनी केले.नरेंद्र पाठक यांचा सत्कार रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवर,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष,उपाध्यक्ष, सहसचिव,कोषाध्यक्ष व सदस्या यांचा सत्कार प्राचार्या,उपप्राचार्या व पर्यवेक्षक,सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेला ७५ खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थांनी देशभक्तीपर समूहगीत,योगा प्रात्यक्षिक,
    भाषणे,सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनपर संगीतमय नाटिका, देशभक्तीपर नृत्य सादर करत देशभक्तीची स्फूर्ती निर्माण केली.याप्रसंगी विविध शालेय स्पर्धात परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी नरेंद्र पाठक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.डॉ.सौ.वृंदा कुलकर्णी यांनीही विद्यार्थांना वैज्ञानिक दृष्ट्या तिरंग्याच्या तिन्ही रंगाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारत देशाची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.संपूर्ण शाळा तिरंग्याच्या रंगाने सजवण्यात आली होती.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.रेणुका भंडारे व सौ.ज्योती देशपांडे तर आभार प्रदर्शन कु.पूजा तनमोर यांनी केले.महेश काकनाळे यांनी वंदे मातरम् गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने