मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयात मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

                         मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयात मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

  लातूर/प्रतिनिधी:शहरात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून गणेश मंडळांना अडचणी येऊ नयेत यासाठी मनपाकडून चारही क्षेत्रीय कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली आहे.याशिवाय नागरिकांनाही तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे.गणेशोत्सव अवघ्या कांही दिवसांवर आलेला असून त्यासाठी मंडळांकडून स्टेज उभारणीची कामेही सुरू झाली आहेत.सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असते.हे प्रमाणपत्र मिळवण्यात मंडळांना अडचण येऊ नये यासाठी पालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी ना हरकत प्रमाणपत्र मिळवू शकतात.गणेशोत्सवा दरम्यान नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात.स्पीकरचा आवाज मोठा असणे,रस्त्यावर स्टेज उभारणेअनधिकृतपणे श्रीगणेशाची स्थापना करणे,असे प्रकार होऊ शकतात.या संदर्भात तक्रार करण्यासाठी पालिकेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. ०२३८२-२४६०७५ या क्रमांकावर दूरध्वनी करून नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत.याशिवाय चारही क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक दिले जाणार आहेत.ए झोनसाठी ९०११०३२२१०,बी झोनसाठी ९८९०४३५९२२,सी झोनसाठी ९४०४२२५३७९ आणि डी झोनसाठी ९०११०३२३०२ हे क्रमांक आहेत.नागरिक या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारेही आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत.मनपाच्या वतीने या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ए व बी झोनसाठी श्रीमती. विना पवार तर सी व डी झोनसाठी श्रीमती.मयुरा शिंदेकर यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने