डॉ.मनिषा कोठेकर यांच्या हस्ते शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन

डॉ.मनिषा कोठेकर यांच्या हस्ते शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन

लातूर :  दयानंद कला महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्राची सोय करण्यात आली. दयानंद शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन तद्अनुषंगाने सुविधा पुरविण्यात अग्रेसर असते. या करीता लाखो रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरण यंत्राची सोय महाविद्यालयात करण्यात आली आहे. या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन  डॉ. मनीषा कोठेकर राष्ट्रीय संघटन सचिव भारतीय स्त्री शक्ती यांच्या हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी असे प्रतिपादन केले की दयानंद कला महाविद्यालय सदैव विद्यार्थी हिताय उपक्रमाचे आयोजन करत आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याची गरज असते. शुद्ध पाण्याचा पुरवठ्यामुळे विद्यार्थी हे निरोगी राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. अरविंदजी सोनवणे, मा.ललितभाई शहा, मा. रमेशकुमारजी राठी, सचिव मा.रमेशजी बियाणे, संयुक्त सचिव मा.सुरेश जैन , कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा श्रीमती सीमाजी देशपांडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भारतीय स्त्री शक्ती, श्रीमती कुमुदिनी भार्गव राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय स्त्री शक्ती, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ. पुनम नाथानी, दयानंद फार्मसी कालेजच्या प्र.प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, द.क.म. उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. शिवाजीराव जवळेकर,डॉ. सुनील साळुंखे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ.रमेश पारवे, प्रा. विवेक झंपले, प्रा. विलास कोमटवाड, प्रा.सुरेश क्षीरसागर, प्रा.महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक रूपचंद कुरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने