औसा तालूका अशासकीय शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

औसा तालूका अशासकीय शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



औसा- औसा अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्थेची 29  वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद कदम  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षकाचेबुलंद तोफ शिक्षकाचे भुषण विक्रमकाळे,औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यु पवार हे प्रमुख पाहूणे उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरुवात   सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व पाहूण्याचे पतसंस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव व संचालक यांनी  फेटा ,शाल, श्रीफल ,पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.यानंतर सालातील सर्व क्षेत्रातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर नूतन मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला.नंतर पतसंस्थेचे अध्यक्ष  कदम यांनी अहवाल वाचन केले. नंतर गुणवंत व सेवानिवृत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्था मिञ पुरस्कार देण्यात आला. नंतर आमदार अभिमन्यु पवार यांचे मनोगत झाले.पतसंस्थेच्या वाटचालीबदल समाधान व्यक्त केले.   नंतर आमदार काळे  सुदधा पतसंस्थेबदल समाधान व्यक्त केले. व रेडडी सर यांनी मनोगत मांडतांना संस्थेच्या व सभासदाच्या हितासाठी जे काही करता येईल त्याची ग्वाही दिली. कर्जाची मर्यादा वीस लाख  आहे  तसेच ठेवीवर व कर्जावरील व्याजाचा दर व लाभांश 10%असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन  गायकवाड सरांनी केले . व आभार प्रदर्शन हलमडगे सर यांनी केले.या कार्यक्रमास जाधव सर , मलेभारी सर , यादव सर ,माने सर ,पाटील सर,व सर्व संचालक व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.   

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने