तुझ्या साठी श्रावण बनून आले नखशिखांत
सप्तरंगी इंद्रधनुचा परिधान केलाय शालू,
रंगीबेरंगी श्रावण फुले माळलीत केसात,
टपोऱ्या गारांची मोतीमाळ घातली गळ्यात,
इवल्या थेंबांचा कंबर पट्टा बांधलाय कमरेला,
उगवत्या सूर्याची चंद्रकोर लावली कपाळाला,
काळ्याकुट्ट मेघांचे काजळ घातलेत डोळ्यात,
मोगऱ्याच्या कळ्यांचे पैंजण घातलेत पायात,
टपटपनाऱ्या पागोळ्यांचा नाद गुंफला पैजनात,
प्रभातीच्या तेजस्वी दवबिंदूचे कर्णफुले कानात
टपोऱ्या चमकणार्या थेंबांचे बाजूबंद घातले दंडात
चौकोनी हिमनगाच्या अंगठ्या घातल्यात बोटात
गोल गोल बर्फाचे कडे घातलेत हातात
पांढर्या शुभ्र हिमकणांचा गजरा माळला कुंतलेत,
तुझ्यासाठी श्रावण बनून आले नखशिखांत.

टिप्पणी पोस्ट करा