आर्य समाजाने स्वतंत्र्यता संग्राम व अन्यायकारी प्रथेविरूध्द लढा दिला- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 आर्य समाजाने स्वतंत्र्यता संग्राम व अन्यायकारी प्रथेविरूध्द लढा दिला- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
 

लातूर-भारत देशातील इंग्रजाविरोधातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1857 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या असंख्य योध्यांना प्रेरीत करून इंग्रजाविरूध्द लढा दिला. मराठवाड्यावरती हैद्राबाद निजामांचे साम्राज्य होते. त्याविरूध्द स्वामी रामानंद तीर्थ व असंख्य आर्य समाजींनी बलीदान देऊन देशाला व मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते कार्य अलौकिक असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते आर्य समाज पश्‍चिम विभाग न्यास, राम नगर, औसा रोड, लातूर यांच्यावतीने 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित श्रावणी वेद प्रचार सप्‍ताहच्या समारोपप्रसंगी बोेलत होते. यावेळी वैदिक विद्वान, सहानरपूर, उत्तरप्रदेशचे पंडीत शिवकुमार शास्त्री, आर्य भजनोपदेशक फरिदाबाद (हरीयाना)  प्रदीपजी आर्य, राजवीर आर्य, ज्ञानकुमार आर्य, आर्य समाज राम नगरचे प्रधान भाईजी एस.आर.मोरे, शकुंतलाताई मोरे, पतंजलि योग समितीचे प्रदेश अध्यक्ष विष्णूजी भूतडा, राजेंद्र दिवे, राम घाडगे, नागराज चुडमूडे, अनंत लोखंडे, रामेश्‍वर राऊत, देवीदास मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, आर्य समाजाने मानवता, समानता राष्ट्र व समाजनिर्मितीसाठी संघर्ष केला. स्वामी दयानंदजींनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना करून याद्वारे हिंदू समाजाचे धर्मांतर, सतीप्रथा, बालविवाह, जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वेद हेच आर्य समाजाचा व धर्माचा आधार आहे. अध्यात्माशिवाय मानवाचे जीवन अधुरे आहे. त्यामुळे देशातील शैक्षणिक शाळा, कॉलेजमधून अध्यात्माची शिकवण द्यावी तरच खरा मानवतावादी राष्ट्रभक्‍त युवक तयार होईल.
खरा साधू कोण?
राष्ट्रसंत मूरारी बापू म्हणतात, फक्‍त अध्यात्मीक प्रभावी विचार मांडल्यमुळे साधू होता येत नाही. त्यासाठी त्यांचे विचार शुध्द असले पाहिजे. अचार, आहार, उच्चार व अंगतविहार शुध्द असेल तर तोच खरा साधू म्हणावा. आज अनेक भगवी कपडे घातलेले अर्धवट साधू जेलमध्ये दिसत आहेत. त्यामुळे खरा साधू ओळखने अवघड आहे असेही कव्हेकर म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानकुमार आर्य यांनी केले तर आभार महामंत्री अनंत लोखंडे यांनी मानले.
कव्हेकर साहेब हे अध्यात्म व आर्य समाजी
विचाराला साथ देणारे नेते आहेत
- शिवकुमार शास्त्री
आर्य समाजी विचाराच्या माध्यमातून अध्यात्म, विचार व क्रांती देणाचे काम केले जात आहे. आजपर्यंतच्या राजकीय नेत्यामध्ये आर्य समाजी विचाराला व कार्याला साथ देणारे नेते कमी आहेत. ही उत्तर प्रदेशातील परिस्थिती आहे. परंतु लातूरसारख्या शैक्षणिक पॅटर्न असलेल्या जिल्ह्यामध्ये माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचा अध्यात्म, विज्ञान व आर्यसमाजी विचारावर खूप मोठा अभ्यास आहे. त्यांनी आर्य समाज राम नगरच्या सभागृह उभारणीसाठी साडेचार लाख रूपये देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे कव्हेकर साहेब हे आर्य समाजी विचाराला साथ देणारे नेते आहेत, त्यांच्या पाठिशी आपण सदैव उभे राहावे, असे आवाहनही वैदिक विद्वान सहारणपूर,उत्तरप्रदेशचे पंडीत शिवकुमार शास्त्री यांनी केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने