काथवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

                     काथवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम


    लातूर/प्रतिनिधी:कै.राघवेंद्र काथवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,कीर्तन तसेच विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले. राघवेंद्रदादा काथवटे प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    बुधवार दि.२४ रोजी जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त राघवेंद्र निवासस्थानी धार्मिक विधी संपन्न झाले.दुपारच्या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथालयातील विद्यार्थ्यांसाठी भोजन सेवा देण्यात
आली.काथवटे परिवाराच्यावतीने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.बारावी परीक्षेतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. गातेगाव येथील भागवताचार्य विद्यानंदसागर महाराज यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.  बुलढाणा येथील पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन संपन्न झाले.या कीर्तनास परसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी काथवटे परिवारातील न्या.रिना खराटे व ऋचा चिकोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याशिवाय सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे विक्रमी रक्तदाते पारस चापसी,प्रभुराज प्रतिष्ठानचे अजय कलशेट्टी,राजेश्वर बुके यांनाही सन्मानित करण्यात आले.
   कै.राघवेंद्र काथवटे यांचे पुत्र जयंत काथवटे,नागेंद्र काथवटे, चंद्रवदन काथवटे,नातू ॲड. दिग्विजय काथवटे,गौरव काथवटे,रमण काथवटे,रितेश काथवटे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने