शेतकरी राजाच्या नजरा आभाळाकडे पावसाची नितांत गरज : शेतकरी आतूर

 

शेतकरी राजाच्या नजरा आभाळाकडे

पावसाची नितांत गरज : शेतकरी आतूर

औसा- (प्रतिनिधी) : खरीप पिकांकरीता आता पावसाची नितांत गरज असून त्यामुळे शेतकरी राजाच्या नजरा आभाळाकडे वळाल्या आहेत.तालूक्यातील मूग, सोयाबिन, ऊडीद, बाजरी, मका, तूर अशा अनेक पिंकाची लागवड केली, पण अचानक पावसाने उघडीप दिली. पाऊस शेतकरी राज्यावरती रूसला की काय? असेच चित्र सध्या निर्मा झाले असून यामूळे सेलू तालूक्यातील शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेतकरी वर्गाने आपआपली जमीन जून महीन्यात मशागत करत लागवडी करीता तयार केली. पाऊस लाबंला पण त्यातच कशाबशा शेतात पेरण्या केल्या. सुरुवातील संततधार पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिन, तूर खुरपणीस शेतकर्याल खूप पैसा लागला. परंतु, आता नेमका सोयाबिन फूलात लागण्याच्या वेळेसच पाऊस मागील 16 दिवसा पासून गायब झाला. त्यामुळे हलक्या रानातील सोयाबिनचे फूल, शेंग गळून पडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असून वरुणराजा कधी बरसेल याची शेतकरी आभाळाकडे नजरा लावून वाट पाहत आहेत.अन्यथा शेतकरी संकटात सापडेल...मागील बर्याच दिवसांपासून पावसाने उघडीत दिली आहे. हाताशी आलेले सोयाबिन, कापूस या पिकाला सध्या पावसाची आवश्यकता आहे. जर या पिकांना योग्यवेळी पाणी नाही मिळाले तर शेतकरी वर्ग संकटात सापडेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी यांनी बोलतांना व्यक्त केली.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने