डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार 


            लातूर/प्रतिनिधी:येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त सामाजिक ऐक्य पंधरवडा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला.यानिमित्त बी.ए.तृतीय वर्षात विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.साक्षी पवार,कालिंदा मुळे, शिवकन्या पांचाळ यांच्यासह एकूण ११ विध्यार्थी ७०टक्केपेक्षा  अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले.या सर्वाचा सत्कार इंदिरा मेमोरियल एज्युकेशनल इन्स्टिट्युटचे सचिव प्राचार्य अंगदराव तांदळे,
प्रा.ओमप्रकाश झुरुळे,महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.बालाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी प्रा. झुरुळे यांनी राजीव गांधी यांच्या जीवन प्रवासावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात UPSC, MPSC व विविध स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होवून यशस्वी व्हावे,महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा असे त्यांनी सांगितले. 
   कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य तांदळे,प्रा.झुरुळे,प्राचार्य डॉ.बालाजी कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थीनींची यावेळी उपस्थिती  होती.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.कांबळे यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य तांदळे यांनी केला.सुत्रसंचलन डाॅ.राजाराम दावणकर तर आभार इतिहास विभागप्रमुख डाॅ.शिवाजी गाढे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने