असून आणखीन ते दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने व्हावे-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील भातखेडा गावाजवळ लातूर - नांदेड महामार्गाच्या बाजूला (क्र.३६१) जिल्हाधिकारी, महामार्गाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार, जवळपासचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले.
याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी देशाच्या मध्यातून जाऊन पूर्व पश्चिम सीमाना जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या या महामार्गाचे काम समाधानकारक होत होत आहे असे नमूद करून आणखीन ते दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने होईल, त्याचबरोबर रस्त्यालगत आणि रस्त्याच्या दुभाजकामध्ये वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, लातूर उपविभागीय अधिकारी सुनील यादव, लातूर तहसीलदार स्वप्निल पवार, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, नॅशनल हायवेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील देशमुख, समन्वयक महादेव जाधव, समन्वयक दत्ता रोडगे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, संभाजी रेड्डी, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, भातांगळीचे सरपंच परमेश्वर पाटील, भातखेडा तलाठी शीतल वंगवाडे, उमेश बेद्रे, बालाजी वाघमारे, अजम शेख ,रुपेश बेदरे, रजाक पठाण, नानासाहेब पाटील, रामचंद्र पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा