चला खेड्याकडे चला वृक्ष चळवळीचे आवाहन
लातूर -विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त पीव्हीआर चौक येथे लातूर वृक्ष चळवळ व सह्याद्री देवराई तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. लातूर जिल्ह्यामधील जंगल जैवविविधता वाचण्यासाठी वृक्ष चळवळीच्या माध्यमातून सह्याद्री देवराई कार्य उभे करत आहे.
त्या अंतर्गत चला खेड्याकडे चला असा संदेश देत वृक्ष चळवळीचे कार्यकर्ते पांडुरंग मोरे हे पुण्याहून सायकल वर निलंगा तालुक्यातील झरी या गावी निघाले आहेत. ते निलंगा तालुक्यातील जरी येथे देवराई उभे करणार आहेत. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे सायकल वर आगमन झाले तेव्हा लातूरमध्ये पीव्हीआर चौकात बोधी वृक्ष देऊन स्वागत केले. यानंतर एमआयडीसी कार्नर एक नंबर चौकात त्यांच्या हस्ते विकासरत्न विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सह्याद्री देवराई वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप, बी.आर. पाटील, श्रीकांत कर्वा, अॅड. सुनील गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, भीम दुनगावे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री सूर्यवंशी, डॉ. दशरथ भिसे, हे उपस्थित होते.
सह्याद्री देवराई व लातूर वृक्ष चळवळीची भुमिका स्पष्ट करताना वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप म्हणाले, की निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो.
परंतु आज गरजेपलीकडे जाऊन हे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन कार्यक्रम’ आम्ही आखला. आणि त्याअंतर्गत वृक्ष लावणे व जोपासणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण ह्यासाठी अनेक संस्थांच्या मदतीने आम्ही हे कार्य जिल्हयात व मराठवाड्यात उभे करत आहोत असे सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा