राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल मध्ये खेळाडूंचा सत्कार

 
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल मध्ये खेळाडूंचा सत्कार


लातूर/प्रतिनिधी:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान आणि श्री. केशवराज् रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
     मुलांमध्ये देशाच्या खेळाविषयी रुची निर्माण व्हावी, बलोपासनेला आयुष्यात महत्वाचे स्थान मिळावे,यशस्वी खेळाडूंच्या यशापासून प्रेरित व्हावे,मुलांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या  उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाशिप्र संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी यांची उपस्थिती होती.सत्कारमूर्ती राधा मगर,धनश्री तळेकर,ऋतुराज नाईक,रुपाली शिंदे,प्राजक्ता कुलकर्णी यांचीही मंचावर उपस्थिती होती. 
    कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
क्रीडा शिक्षक भूषण भावे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद करून सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.सर्व सत्कारमूर्तींचा मान्यवर अतिथींच्या हस्ते उपरणे, सन्मानचिन्ह,ग्रामगीता देवून सत्कार करण्यात आला.
   सत्कारमूर्ती प्राजक्ता कुलकर्णी यांनी खेळाचे महत्त्व,सांघिक यश,
खेळामुळे आपले आयुष्य कसे समृद्ध होते याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
      राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यात धावणे,गोळा फेक, भाला फेक,कब्बडी या खेळांचा समावेश होता.मुलांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
       या कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ.अलिशा अग्रवाल,उपप्राचार्या सौ.अनुराधा कुलकर्णी,सर्व विद्यार्थी तसेच सर्व  शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.अंजली ढोले तर आभार प्रदर्शन सौ.अनुराधा कुलकर्णी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने