उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनातर्फे पुरस्कार
सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय
उस्मानाबाद- राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे
राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० ऑगस्ट २०२२ हा आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा तपशील व अर्जाचा नमुना maharashtra.gov.org या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 26 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयात व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.
टिप्पणी पोस्ट करा