हसलगन येथे रक्तदान शिबिर संपन्न

 हसलगन येथे रक्तदान शिबिर संपन्न



औसा- तालुक्यातील हसलगण या गावामध्ये भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन ( अमृत महोत्सवी वर्ष ) निमित्त *नवतरुण युवक मित्रमंडळ व जि.प.प्रा.शा. हसलगण आयोजित* रक्तदान शिबिरामध्ये 30 जणांनी सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी प्राण गमावले,लढले या सर्वांना आदरांजली, प्रेम म्हणून हसलगण गावातील नवतरुण मित्रमंडळ, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांच्या पुढाकाराने रक्तदानाच्या माध्यमातून हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
          यावेळी हसलगण गावचे चेअरमन खंडू कोराळे, जि.प.प्रा. शाळा.हसलगण शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, डाके सर, वैभव मोरे,लातूर पोलीस- महेंद्र फूलसुंदर,अंगद मस्के या सर्वांनी सहभाग नोंदवला.
   शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक मा.जाधवर सर,वैभव मोरे, शिवकंठ पाटील, धिरज ढोरमारे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, मित्र परिवार व भालचंद्र ब्लड बँक,लातूर टीम या सर्वांनी भरीव सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने