सामाजिक बांधिलकी जपणे ही अतिशय आनंदाची बाब आहे - संतोष सोमवंशी

सामाजिक बांधिलकी जपणे ही अतिशय आनंदाची बाब आहे - संतोष सोमवंशी 


 लातूर- लातूर तालुक्यातील पेठ गावातील ५०० भाविकांना रमेश पाटील माजी तालुकाप्रमुख शिवसेना यांच्या पुढाकाराणे विठ्ठल रुक्मीनी देवदर्शनासाठी घेवून जाण्यात आले. या सात एसटी बसेसला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्याहस्ते झेंडा दाखवून रवानगी करण्यात आली . विठूरायाच्या दर्शनाला घेऊन जाणे हे खूप पुण्याचे कार्य मानले जाते. तरुण पिढीने आशा प्रकारचे उपक्रम हाती घेणे, सामाजिक बांधिलकी जपणे ही अतिशय आनंदाची बाब आहे असे मत संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले.

         शिवसेना माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील यांच्या पुढाकाराने या सर्व भक्ताचे प्रवास , नाष्टा , जेवण करण्यात आले. त्या साठी आगार प्रमुख थडकर युवराज, व्यंकरराव बिराजदार, अरविंद पाटील, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, भागवत जोगदंड, पांडूरंग चपडे, चंदर वाडकर, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, ज्ञानोबा पानढवळे,अभय भोसले, राजकुमार साळुंके, आदीने परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने