लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

                    लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

 औसा - तालुक्यातील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपुर येथे संस्थेचे सचिव  प्रा. दत्तात्रय सुरवसे  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच स्वातंञ्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्य भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये  विद्यार्थ्यीनी आपले विचार मांडले.तसेच शाळेतील स.शि.  कांबळे सर ,सुर्यवंशी सर, नौबदे सर यांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी जि.प, सदस्य लातुर  व्यंकटराव पाटील होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव  प्रा.दत्तात्रय सुरवसे  ,कोषाध्यक्ष   दयानंद चौहान  ,सदस्य  सुयोग सुरवसे ,सदस्या शिल्पा चौहान मँडम उपस्थित होते. प्रा  दत्तात्रय सुरवसे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनीही आपले विचार मांडले.तसेच  विद्यालयात पाच विद्यार्थ्याचे  वाढदिवस होते ते  ही साजरे केले. तसेच आमच्या संस्थेचे  सदस्य  बालाजी माधव जाधव यांचा ही वाढदिवस होता. त्याचे औचित्य साधून त्यांच्या वतीने  विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्याना एक रजिस्टर व एक पेन देऊन साजरा करण्यात आला.  तसेच आमच्या विद्यालयातील स.शि. शिंदे सरांचा वाढदिवस   तो ही  मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.तसेच आमच्या विद्यालयातील  चव्हाण सर व  सुर्यवंशी सर गेल्या दहा वर्षापासून विनाअनुदानित तुकडीवर काम करतात हे पाहून  संस्थेच्या वतीने   दोघांना बंद पाकीट देण्यात आले.यावेळी संस्थेमार्फत सर्वच विद्यार्थ्याना खाऊ ही वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.सानवी पांचाळ  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीने केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे  मुख्याध्यापक अनिल मुळे   यांनी केले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर  कर्मचारी,विद्यार्थी व गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने