रानभाजी महोत्सवामधून आरोग्यविषयक भाज्यांची जनजागृती होत आहे- ज्ञानदेव पवार
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय सभागृह, माणगाव येथे तालुकास्तरीय शानदार रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर रानभाजी महोत्सवाचे उदघाटन मा.नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेव पवार नगरपंचायत माणगाव, यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदर रानभाजी महोत्सवात माणगाव तालुक्यातील श्रीराम महिला शेतकरी गट कोस्ते बुद्रुक ,विठल रूक्मिणी महिला शेतकरी गट कोस्ते बुद्रुक, लक्ष्मी विकास महिला शेतकरी गट खर्डी बुद्रुक, कालकाई माता महिला बचत गट, सावित्री विकास महिला बचत गट भाले, नांदवी , समर्थ कृपा महिला बचत गट पळसगाव , भालजाई विकास महिला बचत गट भाले, आणि इतर १४५ शेतकर्यांनी या रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला होता. रानभाजी महोत्सवावेळी कुर्डु, भारंगी, कारटोळी, अळू, तेरी, टाकळा,कुडा, अळंबी, गुळवेल, गवती चहा, बेल, अडुळसा, कोरफड, बांबू अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच सौ.ममता धुरी यांनी १८ रानभाज्यांची पाककृती तयार करून प्रदर्शनात सादर केली होती. रानभाजी विक्रीसाठी तालुक्यतील ग्राहकांकडून व विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कडून रानभाजी खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव श्री.ए.ए.कांबळे यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये उपस्थित शेतकरी यांना मानवी आरोग्यामध्ये रानभाज्यांचे असलेले महत्त्व पटवून सांगितले. तसेच रानभाज्या उत्पादक शेतकऱयांना तालुक्यातील गृहनिर्माण सोसायटी मध्ये रानभाजी विक्री करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेव पवार नगरपंचायत माणगाव, यांनी रानभाज्यांची लागवड नाविन्यपूर्ण घटकांतून करण्यासाठी विविध योजना तयार करण्याबाबत सुचविले. तसेच रानभाजी महोत्सवामधून आरोग्यविषयक भाज्यांची जनजागृती होत आहे, असे सांगितले, तसेच तालुकास्थरावर रानभाजी विक्री साठी स्वतंत्र विक्री व्यवस्था करण्यात येईल असे आश्र्वासन दिले.
शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री.संदीप खडतर यांनी रानभाज्यांची विक्री व्यवसायिक दृषटिकोनातूनच करणे आवश्यक असल्याचे सांगीतले,यावेळी त्यांनी त्याचे शेतीबदलचे अनुभव सांगीतले. डॉ.मांजरेकर उद्यानविद्या विभाग के. व्ही. के.रोहा यांनी रानभाज्या लागवड, त्यांचे औषधी गुणधर्म, तसेच बियाणे उपलब्धतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.मांजरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच उषा वाघमारे यांनी आपले अनुभव कथन करताना शेतकरी गटामार्फत रानभाजी तसेच नाचणी वरी ई प्रक्रिया करून विक्री करत असल्याबाबत सांगीतले.
तसेच या कार्यक्रमामध्ये कृषि महाविद्यालय महाड येथील विद्यार्थ्यांनी बायोफ्लक मॉडेल, एकात्मिक शेती मॉडेल, लेयर पोल्ट्री फार्म याचे मॉडेल सादर केले.
तसेच कार्यक्रमांचे शेवटी सहभागी सर्व शेतकरी गटांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय ससाने, श्री, संतोष सुरडकर यांनी केले, या कार्यक्रमाला माणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री मोहिते साहेब , कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री साबळे , पंचायत समिती माणगाव कृषी अधिकारी श्री कटरे , श्री लवटे, तसेच कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी ,आत्मा यंत्रणेचे अधिकारी /कर्मचारी तसेच तालुक्यातील ईतर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा