लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य संघटनाकडून लातूरात आरोग्यसेवेचा महायज्ञ

                             लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त

विविध आरोग्य संघटनाकडून लातूरात आरोग्यसेवेचा महायज्ञ

लातूर (प्रतिनिधी):माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर व परीसरात इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून जवळपास ३०० पेक्षा अधिक रूग्णालयात रुग्णांची  मोफत तपासणी  उपचार करण्यात आले, काही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी आज सकाळ पासनूच रूग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो रूग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ झाला आहे.माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

यांनी सर्वांचे आभार मानले

   या महाआरोग्य शिबीरातील आरोग्य सेवेच्या या उपक्रमादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. राजकुमार दाताळ यांच्या पद्मानगर मधील सार्थक रुग्णालयास भेट देऊन उपचारासाठी आलेल्या रुग्णांची अस्थेवायिकपणे  चौकशी केली, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लातूर येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला, आरोग्य शिबिराच्या आयोजनात सातत्य राखून सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल  सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने