खेळात यश -अपयश पचवता आले पाहिजे- महेश भोसले


                                   
खेळात यश -अपयश पचवता आले पाहिजे- महेश भोसले 



लातूर /प्रतिनिधी: हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्री केशवराज विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर, प्रमुख वक्ते म्हणून महेश भोसले, पर्यवेक्षिका अंजली निर्मळे मूल्यमापन विभाग प्रमुख मेघा सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती.
      मेजर ध्यानचंद यांचा जन्म, जन्म ठिकाण,त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दलची माहिती समर्थ आगरकर,श्रेयस चव्हाण, वीरेन जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगतातून सांगितली.यावेळी बोलताना महेश भोसले म्हणाले की,खेळात यश -अपयश पचवता आले पाहिजे. मैदानी व बैठे असे खेळाचे दोन प्रकार त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांची संख्या विद्यार्थ्यांना सांगितली.मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून नियमित खेळण्याचा सल्ला दिला. यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या मजबूत बनू असे ते म्हणाले. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मेघा सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक,परिचय व स्वागत निलेश तावशीकर तर आभारप्रदर्शन संतोष जोशी यांनी केले.राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत पाचवी ते सातवी विभागात कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचे उद्घाटन मनोज शिरुरे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील वसमतकर, लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीरचे  मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, तसेच उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख गुरुनाथ झुंजारे,बलोपासक मंडळातील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने