प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न



बाभळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव येथे संस्था आणि स्टाफ अकॅ दमीच्या वतीने प्राचार्य डॉ. राम वाघ  यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवानिवृत्ती समारंभाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शाम देशमुख, उपाध्यक्ष नरसिंह देशमुख, कोषाध्यक्ष आयुब शेख, संचालक सुवर्णाताई मुळे, सूर्यकांत देशमुख, भीमराव शिंदे यांची उपस्थिती होती.
                प्रारंभी स्टाफ अकादमी प्रमुख डॉ.शाहूराज मुळे यांनी प्रास्ताविक आणि सन्मानपत्राचे वाचन केले तर प्राचार्य डॉ. राम  वाघ यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन, प्राध्यापकांच्या वतीने  डॉ. जयदेवी पवार, प्रा. विवेक कदम यांनी सपत्निक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने शाम देशमुख, बाळासाहेब देशमुख, दयानंद विद्यालय बाभळगावचे मुख्याध्यापक राठोड सर , मोरे सर ,  सूर्यवंशी सर, माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अँड. व्यंकट नाईकवाडे, तानाजी बिराजदार यांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक सन्मान त्यांचा सन्मान केला.
            कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शोभाताई वाघ, डॉ.ज्योती वाघ, मुख्याध्यापक आर. डी. गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. रणजीत जाधव, डॉ. सुरेशकुमार कांबळे, तानाजी बिराजदार, प्रा. संतोष कल्याणकर, विठ्ठल मुळे, हनुमंत शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.
          सूत्रसंचालन डॉ. दुष्यंत कटारे तर आभार डॉ.नरेंद्र देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला दयानंद शिक्षण संकुलातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने