गादवडच्या लोकवस्तीतील स्मशानभूमी हटवण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्या महिला ठाम

 
गादवडच्या लोकवस्तीतील स्मशानभूमी हटवण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 

बसलेल्या उपोषणकर्त्या महिला ठाम


लातूर/प्रतिनिधी-लातूर तालुक्यातील गादवड गावातील भर वस्तीत खंडोबा मंदिरालगत स्मशानभूमी असल्यामुळे याचा त्रास गावातील लहानथोर अबाल वृद्धांना होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या  स्मशानभूमी लगत ५० ते ६० रहिवाशी घरे आहेत. त्यामुळे सदरची स्मशानभूमी हटविण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून गादवड येथील काही महिला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला गावातीलच काही ग्रामस्थांनी  विरोध दर्शवला असून त्यांनी  स्मशानभूमीची खोटी कागदपत्रे, ठराव तयार करून प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. असा आरोप उपोषणकर्त्यांनी आज केला आहे.
   तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत. असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले. भर गावात असलेल्या स्मशानभूमीमुळे  नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची निष्पक्ष चौकशी आणि वस्तस्थितीचा विचार करून सदरची स्मशानभूमी हटवण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्या महिला बबिता बोंद्रे, आशा बोंद्रे, वैशाली बोंद्रे, वंदना बोंद्रे, छाया बोंद्रे, मनीषा बोंद्रे, प्रभावती बोंद्रे, धनश्री बोंद्रे आदीनी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने