दयानंद विधी महाविद्यालयात शासनाकडून नवीन अभ्यासक्रमास मंजूरी

 दयानंद विधी महाविद्यालयात शासनाकडून नवीन अभ्यासक्रमास मंजूरी




लातूर – लातूर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता बाहेरगावी न जाता त्यांच्या शैक्षणिक गरजांना वेळोवेळी महत्त्व देत दयानंद शिक्षण संस्थेने इ.स. 1971 मध्ये दयानंद विधी महाविद्यालयाची सुरूवात केली.दयानंद शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरीता व समाजाभिमुख कार्याकरीता कटिबद्ध असलेली दिसून येते. संस्थेच्या विविध महाविद्यालयाद्वारे केल्या जाणा-या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर स्तरावरील दर्जेदार उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. दयानंद विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विधी क्षेत्रात बी.ए. एल.एल.बी, एल.एल.बी., एल.एल.एम. (क्रमिनल लॉ) ह्या अभ्यासक्रमांसह डी.टी.एल., एल.पी.एस.एस. ए.डी.आर., आय.पी.आर. ह्या एक वर्षिय पदविका अभ्यासक्रमांचीही सुरूवात केली.शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा व विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने दयानंद विधी महाविद्यालयाने एल.एल.एम. (बिझनेस लॉ) ह्या नवीन अभ्यासक्रमाची मागणी शासनदरबारी केली असता शै.वर्ष 2022-2023 पासून सदर अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही नवी संधी दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नामुळे प्राप्त झाले आहे. महाविद्यालयात  विद्यार्थ्याच्या गुणवता वाढीबरोबर त्याच्या  सर्वांगीण विकासाकडे मानवी दृष्टीकोणातून लक्ष देणारा व विषयात तज्ज्ञ असणारा प्राध्यापक वर्ग महाविद्यालयात कार्यरत आहे.विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आजच आपला प्रवेश निश्चित करण्याकरीता महाविद्यालयास संपर्क करावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी. पी. नाथानी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने