डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा विषयक वेबीनारचे आयोजन
लातूर /प्रतिनिधी :दयानंद कला महाविद्यालयामध्ये डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या 130 वी जयंती साजरी करुन ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त UGC NET या स्पर्धापरीक्षसाठी आवश्यक असणारा ऑनलाईन वेबिनार IFAS Institute तर्फे असोसिएट प्रोफेसर मनिका जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक 11 ते 12 या वेळेत संपन्न झाला. या प्रसंगी मनिका जैन मॅडमनी UGC NET परीक्षेचा क्रायटेरिया सांगितला तसेच UGC NET च्या पहिल्या पेपरचे विश्लेषण करुन विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेसाठी अजून प्रोत्साहन दिले.
तसेच डॉ. एस.आर. रंगनाथन जयंती आणि ग्रंथपाल दिनानिमित्त डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रमुख अतिथी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. किरण भिसे उपस्थित होते. यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या पंचसूत्री बद्दल विश्लेषन केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. अपर्णा पसारकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा जपता आला पाहिजे असे या प्रसंगी सांगितले. या कार्यक्रमासाठी सुधीर जाधव, श्रीकांत जोशी, ठाकूर विक्रमसिंह, गिरबने दिलीप, गायकवाड माधव, संगीता मोरे, सागर इंदानी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी श्री. राहुल दणदिवे तर आभार सहा. ग्रंथपाल प्रा. विणा कुलकर्णी यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता केली.
टिप्पणी पोस्ट करा